Popular Posts

Tuesday, July 20, 2010

काल माझ्या सत्कार माझ्या माहेरी झाला .


काल माझ्या सत्कार माझ्या माहेरी झाला .  दचकलात ! डॉक्टर काय घरजावई आहेत का? असा प्रश्न मनात आला का? नाही तसे कांही नाही. आज काल व्यवसाया मुळे बालपणी आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालेलो असतो ते गाव आपणास सोडावे लागते.नवीन गावात संसार थाटावा लागतो .यामुळे बालपणीचे गाव हे आपले एक परीने माहेरच असते नाही का? माझे बालपण परभणीत गेले,  शिक्षणा करता आधी अंबेजोगाई नंतर डॉक्टर की करता महाड कोकण येथे स्थायिक व्हावे लागले. त्याला ही आज २५ वर्षे होवून गेलीत. महाड ने खूप कांही दिले. नाव पैसा तरी पण माहेरची आठवण कांही मनातून जात नाही.....
 
काल अचानक माहेरी परभणीला जाण्याचा योग चला मुलांना घडवू या! या माझ्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमा मुळे जुळून आला. परभणी करांनी माझ्या कार्यक्रमाला जी दाद दिली त्याला तोड नाही. 
                                               आता मला पटले स्त्रिया माहेर बद्दल का हळव्या असतात.

No comments:

Post a Comment